कॅन्सर पेशींचा उगम शरीराच्या आत च होतो शरीराच्या
एखादया अवयवावर ताबा मिळून तेथे ह्या पेशी शरीर
नियमनाच्या विरुद्ध वेड्या वाकड्या
बिनधास्त पणे वाढतात
व आपल्या प्रमाणे च असंख्य पेशींचे निर्माण करतात व त्यातून शरीरावर गाठी, रक्त स्त्राव चट्टा .निर्माण होतो व शरीरावर ज्या ज्या ठिकाणी हा पसरतो तो तो अवयव हा नासून टाकतो . जगभरात कॅन्सर चे वेगवेगळे प्रकार आहे त्या मुळे त्याची चिकित्सा व तपासणी करणं खूप गुंतागुंतीचं काम आहे , कॅन्सर हा कुठल्या ही वयातल्या व्यक्तीला होऊ शकतो व तो होण्याची करणे ही अनेक आहे माणसाचे राहणीमान खाण्यापिण्याच्या सवई व्यसन ,सतत प्रदूषणा त काम करत रहाण रेडिशन च्या संपर्कात वेळोवेळी आल्याने ,नेहमी घट्ट कपडे वापरल्याने किंवा करकचून आवळ बांधल्याने त्वचेला जखम होऊन ,नेहमी बाहेर खाण्याची सवय ,खाण्यापिण्यांत मिसळलेली कुत्रिम रंग किंवा पॅकेट मध्ये साठून ठेवलेल अनन् . अशी अजून अनेक करणे कॅन्सर शी निगडीत आहे धूम्रपान करणार्यांना हा धोका जास्त पटीने वाढतो सुप्त अवस्तेत असलेला कॅन्सर जागा होण्यासाठी एखादा आघात ,अपघात ही कारणी येतो महिन्या पेक्षा जास्त कालावधीत टी कलेला एखादा लालसर चट्टा ,किंवा जखम , कॅन्सर चा रेड सिग्नल असू शकतो. पण जसजसा व्यक्ती चे वय वाढू लागते तसा ह्या आजाराचा धोका ही वाढू लागतो .महिलांमध्ये योनीमार्गातुन श्रवणारे द्रव्य पांढरे चट्टे पण लाज व संकोच ह्यामुळे बऱ्याच वेळा तो अंगावर काढता व आजार वाढत जातो ,ग्रामीण भागात सतत चुली च्या धुराच्या संपर्काने घशाचा कॅन्सर संभवतो ,तसेच तंबाखू मिसरी चे अती प्रमाण
ही असतेच .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा